Diwali Special Recipes (दिवाळीचा फराळ)

 

खुसखुशीत शंकरपाळी

साहित्य

१/४ कप दूध
१/४ कप तूप
१/४ कप साखर
१ १/२ कप मैदा

कृती

१) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यावे. आणि हे मिश्रण थंड करून घ्यावे.
२) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. मैदा एकदम घट्ट किवा सैल मळू नये मध्यमसर मळावे. मळलेले पीठ १ तास झाकून ठेवावे.
३) तासानंतर पीठ पून्हा एकदा मळून घ्यावे. त्याचा गोळा करून जाड पोळी लाटून घ्यावी. फिरकीने त्याचे शंकरपाळे कापुन घ्यावे.
४) तुमच्या आवडीनुसार तेलात किंवा तूपात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

रवा नारळाचे लाडू

साहित्य :

२ कप रवा
१ कप खोवलेला ताजा नारळ
दीड कप साखर
१ कप पाणी
३ ते ४ टेस्पून तूप
१/२ टीस्पून वेलची पूड
२५ मनुका

कृती :

१) रवा माध्यम आचेवर ४ – ५ मिनिटे कोरडाच भाजावा.
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात नारळ घालून मिसळून घ्यावे.
३) कढई गरम करून त्यात तूप घालावे रवा नारळाचे मिश्रण घालून, खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून घ्यावेत.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक तयार करून घ्यावा. साखर पाण्याचे मिश्रण उकळायला लागले की साधारण ३ -४ मिनिटांनी एकतारी पाक तयार होतो.
५) पाक तयार झाला की लगेच रव्याच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण ५ – ६ तास मुरवत ठेवावे. घट्ट झाले की लाडू बनवावेत. प्रत्येक लादावावर एक मनुका लावून सजवावे.
टीप :

हे लाडू जास्त टिकत नाहीत. २ -३ दिवसानंतर राहिल्यास फ्रीज मध्ये ठेवावेत.

बेसन लाडू

साहित्य :

दीड पेला बेसन
पाऊण पेला तूप
अर्धा पेला पिठीसाखर
१/२ टीस्पून वेलचीपूड
मनुका किंवा सुका मेवा आवडीनुसार
कृती :

१) बेसन तुपामध्ये माध्यम आचेवर भाजून घ्यावे (साधारण ३५ – ४० मिनिटे)
२) खमंग वास आला की आच बंद करा. बेसन पूर्ण गार होऊ द्यावे.
३) थंड झाल्यावर साखर टाका. सुकामेवा, वेलचीपूड टाका. हलके माळून ठेवून द्या. व लाडू वळून घ्या


Leave a Reply

*